13.11.2025 : नैसर्गिक शेती परिषदेच्या आयोजनासंदर्भात राज्यपालांच्या सचिवांनी घेतली आढावा बैठक
नैसर्गिक शेती परिषदेच्या आयोजनासंदर्भात राज्यपालांच्या सचिवांनी घेतली आढावा बैठक
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या नैसर्गिक शेती परिषदेच्या नियोजनास संदर्भात राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी आज परिषदेसंबंधी अधिकाऱ्यांची गुरुवारी (दि. १३) राजभवन मुंबई येथे बैठक घेतली.
या बैठकीला राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरु तसेच पशु विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
यावेळी राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत तसेच कृषी विभागाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला तसेच भावी कार्याबद्दल माहिती घेण्यात आली.
यावेळी कृषी विभागाच्या ‘आत्मा’, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा), महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट), स्मार्ट प्रकल्प तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.