बंद

    13.03.2024: पंतप्रधानांच्या दूरस्थ उपस्थितीत ‘प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण या उपक्रमाचा तसेच पोर्टलचा शुभारंभ

    प्रकाशित तारीख: March 14, 2024

    पंतप्रधानांच्या दूरस्थ उपस्थितीत ‘प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण या उपक्रमाचा तसेच पोर्टलचा शुभारंभ

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज ‘प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण (पीएम – सुराज) या उपक्रमाचा तसेच पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिकदृष्ट्या मागास, अनुसूचित जाती, जमाती आणि समाजातील वंचित घटकांतील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस या कार्यक्रमाला दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते.