13.02.2025: राज्यपालांनी घेतला डॉ होमी भाभा विद्यापीठाचा आढावा

राज्यपालांनी घेतला डॉ होमी भाभा विद्यापीठाचा आढावा
राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि. १३) डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरु प्रा. डॉ रजनीश कामत यांनी राज्यपालांपुढे विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले.
बैठकीत विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस संकल्पना, सेंटर ऑफ हॅपिनेस, भावी योजना, शैक्षणिक वेळापत्रक, शाळांशी संवाद, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, स्वच्छ भारत अभियान, ‘विकसित भारत’ उपक्रम, आदिवासी विद्यार्थी उत्थान योजना, क्रीडा संस्कृतीला चालना आदी विषयांवर चर्चा झाली.
डॉ होमी भाभा समूह विद्यापीठामध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालय, शासकीय विज्ञान संस्था यांसह ६ संस्थांचा समावेश आहे.
बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास पाध्ये हे देखील उपस्थित होते.