12.09.2024: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या बोधचिन्हाचे राज्यपालांनी केले अनावरण
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या बोधचिन्हाचे राज्यपालांनी केले अनावरण
वर्ष २०२४ – २५ या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून (७५० वर्षे) महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे एका बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाचीच्या वतीने राज्यपालांना संत ज्ञानेश्वरांची मूर्ती तसेच गौरवपत्र देण्यात आले.
यावेळी कमिटीचे प्रमुख विश्वस्त ऍड राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ, व्यवस्थापक राजेंद्र वीर व जनसंपर्क अधिकारी उमेश बागडे प्रामुख्याने उपस्थित होते.