12.08.2024: विनोद माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख
विनोद माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख
नवभारत समुहाचे मुख्य व्यवस्थापकीय संपादक विनोद माहेश्वरी यांच्या निधनाबददल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
नवभारत हिंदी व नवराष्ट्र मराठी वृत्तपत्रांचे मुख्य व्यवस्थापकीय संपादक विनोद माहेश्वरी यांच्या निधनाचे वृत समजून दुःख झाले. विनोद माहेश्वरी हे उत्कृष्ट पत्रकार, मनमिळावू व्यक्ती व समाज सेवक होते.
आपले वडील, स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. रामगोपाल माहेश्वरी यांनी सुरु केलेल्या नवभारत दैनिकाला त्यांनी वेगळया उंचीवर नेले. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक ध्येयनिष्ठ पत्रकार तसेच समाजसेवक गमावला आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोक संदेशांत म्हटले आहे.