बंद

    11.12.2022: महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, नागपूरचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन

    प्रकाशित तारीख: December 11, 2022

    महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, नागपूरचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा 520 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा, नागपूर आणि शिर्डी यांना जोडतो.

    पार्श्वभूमी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, नागपूर आणि शिर्डी यांना जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या, 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.

    समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे (महासंपर्क द्रुतगती महामार्ग)प्रकल्प, हे देशभरातील संपर्क व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा 701 किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती महामार्ग, भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्गांपैकी एक आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रामधून जातो. या द्रुतगती महामार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांमधला संपर्क वाढण्यातही मदत होईल, परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यात मदत होईल.

    पंतप्रधान गती शक्ती योजने अंतर्गत, पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन आणि समन्वित अंमलबजावणीच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला सामावून घेत, हा समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजिंठा एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार अशा पर्यटन स्थळांना जोडेल. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग हा एक महत्त्वाचा ‘गेम चेंजर’ प्रकल्प ठरेल