बंद

    11.03.2026: नवनियुक्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; चैत्यभुमी तसेच सावरकर स्मारक येथे देखील भेट

    प्रकाशित तारीख : March 11, 2026
    Governor visits Swatantryaveer Savarkar National Memorial

    नवनियुक्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; चैत्यभुमी तसेच सावरकर स्मारक येथे देखील भेट

    राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी बुधवारी (दि. 11 मार्च) दादर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापौर रितू तावडे देखील उपस्थित होत्या.

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यानंतर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.

    मुंबईच्या महापौर रितू तावडे, भन्ते राहुल बोधी महाथेरो, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यावेळी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे प्रताप कांबळे, भिकाजी कांबळे व प्रतीक कांबळे यांनी राज्यपालांना संविधानाची प्रत भेट दिली.

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे देखील भेट दिली व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, माजी खासदार राहुल शेवाळे, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर व खजिनदार मंजिरी मराठे उपस्थित होते. स्मारकाच्या वतीने राज्यपालांना सावरकरांची प्रतिमा तसेच सावरकर विषयी ग्रंथ भेट देण्यात आले.
    ***
    नवनियुक्त राज्यपाल द्वारा छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन; चैत्यभूमि और सावरकर स्मारक का भी दौरा

    राज्यपाल पद का कार्यभार संभालने के बाद पहले ही दिन महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने मुंबई के दादर स्थित छत्रपती शिवाजी महाराज की अश्वारूढ़ प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर उन्हें नमन किया। इस अवसर पर मुंबई की महापौर रितू तावडे भी उपस्थित थीं।

    इसके बाद राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने चैत्यभूमि जाकर भारत रत्न डॉ बी आर आंबेडकर की स्मृति को अभिवादन किया ।

    राज्यपाल की उपस्थिति में त्रिशरण बुद्ध वंदना का आयोजन किया गया।

    इस अवसर पर मुंबई की महापौर रितू तावडे, भन्ते डॉ राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिति के महासचिव नागसेन कांबळे उपस्थित थे। भारतीय बौद्ध महासभा के प्रताप कांबळे, भिकाजी कांबळे और प्रतीक कांबळे ने राज्यपाल को संविधान की प्रति भेंट की।

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक का भी दौरा किया और वीर विनायक दामोदर सावरकर की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें अभिवादन किया ।

    इस अवसर पर मुंबई की महापौर रितू तावडे, पूर्व सांसद राहुल शेवाले, स्मारक के कार्याध्यक्ष रणजीत सावरकर तथा कोषाध्यक्ष मंजिरी मराठे उपस्थित थे। स्मारक की ओर से राज्यपाल को वीर सावरकर की प्रतिमा तथा सावरकर पर आधारित ग्रंथ भेंट किए गए।
    **