11.02.2025: आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून राज्यपालांसमोर सादरीकरण

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून राज्यपालांसमोर सादरीकरण
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. माधुरी कानिटकर यांनी आज राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांच्यापुढे विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले. यावेळी त्यांनी राज्यपालांना विद्यापीठाच्या व्हिजन डॉक्युमेंट व रोडमॅपची माहिती दिली.
बैठकीत विद्यापीठातील अध्यापकांची संख्या, विद्यार्थी कल्याण योजना, विद्यापीठ परीक्षा व्यवस्थापन पद्धती, वसतिगृह सुविधा, आदिवासी संशोधन केंद्र, विद्यार्थ्यांच्या समस्या यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रकुलगुरु मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ आदी उपस्थित होते.