बंद

    10.03.2026: जिष्णु देव वर्मा यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

    प्रकाशित तारीख : March 10, 2026
    10.03.2026:  लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा  यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.  शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा तसेच इतर कुटुंबीय, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, मुंबईतील विद्यापीठांचे कुलगुरु, राजशिष्टाचार सचिव राजेश गावंडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    जिष्णु देव वर्मा यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ
    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन
    नौदलातर्फे मानवंदना

    त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.

    लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.

    शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

    यावेळी राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. जिष्णु देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

    दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

    शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा तसेच इतर कुटुंबीय, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, मुंबईतील विद्यापीठांचे कुलगुरु, राजशिष्टाचार सचिव राजेश गावंडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली.
    कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँडने वाजवलेल्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता ‘वंदे मातरम’ व राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.

    दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी जिष्णु देव वर्मा यांची तेलंगणाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाली. सन २०१८ ते २०२३ या कालावधीत ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. जिष्णु देव वर्मा यांनी वित्त, ग्राम विकास व ऊर्जा खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे.

    आधुनिक कला, चित्रकला आणि शिल्पकलेची आवड असलेले जिष्णु देव वर्मा हे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) संस्थेच्या त्रिपुरा विभागाचे संयोजक होते आणि संस्थेच्या ईशान्य भारतातील उपक्रमांचे समन्वयक होते. ते उत्तम लेखक व कवी देखील आहेत.
    ****
    जिष्णु देव वर्मा ने महाराष्ट्र के राज्यपाल पद की शपथ ली
    मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्रियों ने दी बधाई
    नौसेना की ओर से दी गई मानवंदना

    त्रिपुरा के माणिक्य राजवंश के सदस्य तथा तेलंगाना के पूर्व राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज महाराष्ट्र के राज्यपाल पद की शपथ ली ।

    महाराष्ट्र लोक भवन के दरबार हॉल में आयोजित शपथग्रहण समारोह में मुंबई उच्च न्यायालय के मुख्य न्यायमूर्ति श्री चंद्रशेखर ने जिष्णु देव वर्मा को राज्यपाल पद की शपथ दिलाई।

    शपथग्रहण के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ति चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने राज्यपाल को पुष्पगुच्छ भेंट कर बधाई दी।

    इस अवसर पर भारतीय नौसेना की ओर से राज्यपाल को मानवंदना भी दी गई। जिष्णु देव वर्मा महाराष्ट्र के 22 वें राज्यपाल हैं।

    दिनांक 12 सितंबर 2025 को महाराष्ट्र के तत्कालीन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन के भारत के उपराष्ट्रपति पद पर निर्वाचित होने के बाद, गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत को महाराष्ट्र के राज्यपाल पद का अतिरिक्त प्रभार सौंपा गया था।

    शपथग्रहण समारोह में राज्यपाल की पत्नी सुधा देव वर्मा तथा अन्य परिजन, विधान परिषद के सभापति प्रो. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भूतपूर्व मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, विधान परिषद की उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी आपूर्ति मंत्री छगन भुजबळ, कौशल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तकनीकी शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटिल, अन्न व औषधि प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबई की महापौर रीतू तावड़े, पुलिस महानिदेशक सदानंद दाते, राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई के विभिन्न विश्वविद्यालयों के कुलपति, राजशिष्टाचार सचिव राजेश गावंडे तथा अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
    कार्यक्रम की शुरुआत में मुख्य सचिव राजेश अग्रवाल ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू द्वारा जारी जिष्णु देव वर्मा की नियुक्ति संबंधी अधिसूचना पढ़कर सुनाई। कार्यक्रम की शुरुआत पुलिस बैंड द्वारा बजाए गए राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगान और राज्यगीत से हुई तथा समापन ‘वंदे मातरम्’ और राष्ट्रगान से हुआ। शपथग्रहण के बाद भारतीय नौसेना की ओर से राज्यपाल को मानवंदना दी गई।

    दिनांक 31 जुलाई 2024 को जिष्णु देव वर्मा को तेलंगाना का राज्यपाल नियुक्त किया गया था। वर्ष 2018 से 2023 के बीच वे त्रिपुरा के उपमुख्यमंत्री रहे। इस दौरान उन्होंने वित्त, ग्राम विकास और ऊर्जा विभागों का कार्यभार संभाला।

    आधुनिक कला, चित्रकला और मूर्तिकला में रुचि रखने वाले जिष्णु देव वर्मा इंडियन नेशनल ट्रस्ट फॉर आर्ट एंड कल्चरल हेरिटेज (INTACH) के त्रिपुरा चैप्टर के संयोजक रहे हैं तथा उत्तर-पूर्व भारत में संस्था की गतिविधियों के समन्वयक भी रहे हैं। वे एक अच्छे लेखक और कवि भी हैं।
    **