बंद

    09.08.2022 : माईक हँकी – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: August 9, 2022

    माईक हँकी – राज्यपाल भेट

    अमेरिकेचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदुत माईक हँकी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी माईक हँकी यांनी अमेरिका – भारत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या योजना व प्राधान्यक्रम याबाबत राज्यपालांना माहिती दिली. गेल्यावर्षी भारतातून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी ६२००० विद्यार्थी गेले होते. हे सर्व विद्यार्थी अमेरिकेचे सदिच्छा राजदूत आहेत, असे सांगून भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील वर्षी १ लाख इतकी वाढविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे वाणिज्यदूतांनी यावेळी सांगितले.

    बैठकीला राजकीय व आर्थिक सल्लागार क्रिस्टॉफर ब्राऊन तसेच अमेरिकेच्या मुंबई वाणिज्यदूतावासातील राजकीय सल्लागार प्रियांका विसारिया – नायक उपस्थित होते.