09.04.2025: महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
महावीर जयंतीचा दिवस तीर्थंकर भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, त्याग, क्षमा, जीवदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण करून देतो. महावीर जयंती निमित्त मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः जैन बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.