बंद

    09.02.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची फ्लाइंग क्लबला भेट

    प्रकाशित तारीख: February 9, 2021

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची फ्लाइंग क्लबला भेट

    गोंदिया, दि. 9 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बिरसी येथील
    फ्लाइंग क्लबला भेट देवून पाहणी केली. अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या
    गोंदिया जिल्ह्यात तुम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे. या संधीचे
    सोने करा. जशी भरारी आकाशात घेता तशी गगनभरारी सामाजाच्या सर्वागिण
    विकासासाठी अंगिकारुन समाजाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशिल रहावे, असे
    ते म्हणाले. प्रफुल्‍ल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया येथे फ्लांईग
    क्लब संस्थेची स्थापना करण्यात आली, ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद
    असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी संस्थेचे संचालक अवतारसिंग यांनी राज्यपाल व श्री.
    पटेल यांना स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला. राज्यपालांनी प्रशिक्षणार्थी
    विमानात बसून पायलट प्रशिक्षणाचे निरिक्षण केले व तांत्रिक बाबी जाणून
    घेतल्या.

    तत्पुर्वी आज सकाळी 11 वाजता बिरसी विमानतळ येथे श्री.
    कोश्यारी त्यांचे आगमन झाले. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी
    राज्यपाल कोश्यारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले़

    खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी
    दीपक कुमार मीना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा
    पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, माजी
    खासदार मधुकर कुकडे, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे आदी विमानतळावर
    उपस्थित होते.