08.09.2024: पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी व्ही आनंदा बोस यांनी घेतली राज्यपालांची भेट

पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी व्ही आनंदा बोस यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई भेटीवर आलेले पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी व्ही आनंदा बोस यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ. बोस यांनी राज्यपालांच्या निवासस्थानी बसविलेल्या गणरायाचे दर्शन घेतले.