बंद

    08.01.2025: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: January 9, 2025
    08.01.2025: राज्यपालांची जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट

    डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला राज्यपालांची भेट

    डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी साधला राज्यपालांनी संवाद

    जळगाव दि. 8 ( जिमाका ) सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्वसामान्यांना शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनपर अभ्यासक्रमावर भर द्यावा. कारण आता जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे वेळ वाया न घालविता संधीचे सोने करा असा कानमंत्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.

    राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. केतकी पाटील सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.