बंद

    07.10.2025: राजभवन येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

    प्रकाशित तारीख : October 7, 2025
    ०७.१०.२०२५: मुंबईतील लोकभवन येथे महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी याप्रसंगी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. राज्यपालांचे उपसचिव एस. रामामूर्ती, राज्यपालांच्या घरांचे नियंत्रक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे अतिरिक्त उपायुक्त लेफ्टनंट विक्रम कुमार, लोकभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही महर्षी वाल्मिकींना आदरांजली वाहिली.

    राजभवन येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

    महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. ७ ऑक्टो.) महाराष्ट्र राजभवन येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

    राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील महर्षी वाल्मिकी यांना यावेळी अभिवादन केले.