07.09.2025 : ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ईद ए मिलाद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला मिलाद उन नबी त्यांच्या प्रेम, दया, परोपकार व त्यागाच्या शाश्वत शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद-ए-मिलाद निमित्त सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.