07.09.2024: राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे गणरायाची प्रतिष्ठापना
गणेश चतुर्थी@राजभवन
राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे गणरायाची प्रतिष्ठापना
गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे आपल्या ‘जल भूषण’ या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांसह गणरायाची आरती केली.
राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, राज्यपालांच्या सह सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी हे यावेळी उपस्थित होते.