बंद

    07.07.2025: सरन्यायाधीश न्या. गवई यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख : July 7, 2025
    ०७.०७.२०२५: भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. राज्यपालांनी न्यायमूर्ती गवई यांना भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.

    सरन्यायाधीश न्या. गवई यांनी घेतली राज्यपालांची भेट

    राज्यपालांकडून न्या. भूषण गवई यांचा सत्कार

    भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी न्या. गवई यांचे अभिनंदन केले तसेच पुष्पगुच्छ तसेच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.