06.12.2025 राज्यपालांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
राज्यपालांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्र लोकभवन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.