बंद

    06.12.2019 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी राज्यपाल,विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख: December 6, 2019

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी
    राज्यपाल,विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांचे अभिवादन

    मुंबई दि 6 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
    यावेळी राज्यपाल म्हणाले,आपण सर्व मिळून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बनवण्याचा प्रयत्न करुया. बाबासाहेबाचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहेत.त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश त्यांना आज अभिवादन करीत आहे. मी ही त्यांना विन्रम अभिवादन करित आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
    मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बाबासाहेबांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. सामान्य माणसांला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथे 22 वर्षे वास्तव्य होते. ते निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात,आमदार आदित्य ठाकरे ,मुबंईच्या महापौर किशोरी पेंडणेकर, महापालिका आयुक्त प्रविण परदेशी अदि उपस्थित होते.
    राज्यपाल श्री. कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. ठाकरे, विधान सभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या हस्ते श्रीमती कमला मेहता अंधशाळा दादर येथील अंध विद्यार्थ्यांना भेट वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली.