बंद

    06.09.2024: विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना वित्तीय संस्थांची भूमिका महत्वाची” : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: September 7, 2024
    06.09.2024: राज्यपालांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयासमोर वृषभ (बुल) व सामान्य लोक दर्शवणारया शिल्पाकृतीचे अनावरण केले

    विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना वित्तीय संस्थांची भूमिका महत्वाची” : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    आपल्या स्थापनेपासून गेल्या ३० वर्षांमध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने देशाच्या आर्थिक विकासात आणि विकास सर्वसमावेशक करण्यात क्रांतिकारक योगदान दिले आहे. आज नॅशनल स्टॉक एक्सस्चेंज लहान गावापासून मोठ्या शहरातील गुंतवणूकदाराला धनसंपदा निर्मितीमध्ये सहभागी होण्याची संधी देत आहे. विकसित भारताचे लक्ष्य गाठताना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजसह देशातील वित्तीय संस्थांची भूमिका महत्वाची असेल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले.
    बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयात राज्यपालांच्या हस्ते वृषभ (बुल) व सामान्य गुंतवणूकदार दर्शवणाऱ्या शिल्पाकृतीचे शुक्रवारी (दि. ६ सप्टेंबर) अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्मितीपासून इतिहास सांगणाऱ्या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
    कार्यक्रमाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, डीआरचोकसी फिनसर्वचे व्यवस्थापकीय संचालक देवेन चोकसी तसेच गुंतवणूकदार व एनएसईचे अधिकारी उपस्थित होते.
    आज लहान गावातील लोकांना देखील स्टॉक मार्केट मध्ये आपला स्वकमाईचा पैसे गुंतवताना एक विश्वास वाटतो. एनएसईने आपल्या पारदर्शी कार्याने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.