06.07.2023 : राष्ट्रपतींचे राजभवन येथे आगमन व स्वागत
राष्ट्रपतींचे राजभवन येथे आगमन व स्वागत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज २ दिवसांच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांचे राजभवन येथे स्वागत केले.
तत्पूर्वी राष्ट्रपतींचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. आगमनानंतर लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिन्ही सैन्यदलांतर्फे मानवंदना देण्यात आली.
राष्ट्रपती आज दुपारी सिद्धिविनायक मंदिराला भेट देणार असून संध्याकाळी ६.४५ वाजता महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
दि. ७ रोजी राष्ट्रपती राजभवनातील ‘क्रान्तिगाथा’ या ब्रिटिशकालीन भूमिगत बंकरमध्ये तयार करण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देणार असून त्यानंतर त्या शिर्डी कडे रवाना होणार आहेत.