06.06.2025: बकरी ईद निमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा
बकरी ईद निमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद अल – अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ईद मुबारक! ईद अल – अधा (बकरी ईद) हा सण त्याग, करुणा व परोपकाराचा संदेश देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, सौहार्द व समृद्धी घेऊन येवो या मंगल कामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद अल अधाच्या शुभेच्छा देतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.