बंद

    06.03.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृक्श्राव्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील काही मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन

    प्रकाशित तारीख: March 7, 2024

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलकत्ता येथून दृक्श्राव्य प्रणालीद्वारे देशातील काही मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन केले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस या कार्यक्रमाला राजभवन, मुंबई येथुन दुरस्थ माध्यमाद्वारे उपस्थित होते.
    यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र मेट्रो कॉपोरेशन लि. च्या पुणे मेट्रो प्रकल्पामधील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी स्थानक मार्गाचे उदघाटन तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते निगडी या उन्नत मेट्रो मार्गाचे भूमीपूजन करण्यात आले.