बंद

    05.07.2021: राज्यपालांच्या हस्ते देशपांडे पंचागाचे प्रकाशन

    प्रकाशित तारीख: July 5, 2021

    राज्यपालांच्या हस्ते देशपांडे पंचागाचे प्रकाशन

    पंचागकर्ते गौरव रवींद्र देशपांडे यांनी तयार केलेल्या सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांगाच्या १० व्या वार्षिक आवृत्तीचे प्रकाशन आणि संकेत स्थळाचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ५ जुलै) राजभवन येथे संपन्न झाले.

    सूर्यसिद्धांत पंचांग गणित पद्धती ही भारतीय खगोलशास्त्राची अचूक अशी पंचांग निर्माण पद्धती असून मागील ६०-७० वर्षांपासून या पद्धतीनुसार पंचांगनिर्मितीची परंपरा महाराष्ट्रात बंद पडली होती, ती मागील १० वर्षांपासून परत महाराष्ट्रात सुरु केली आहे असे यावेळी संगणक अभियंता असलेल्या गौरव देशपांडे यांनी राज्यपालांना सांगितले.

    या कार्यक्रमास गौरव देशपांडे यांचेबरोबर हेमांगी देशपांडे , सुरेखा देशपांडे व ऋतंभरा देशपांडे उपस्थित होते.