बंद

    05.02.2025 – मा. आगा खान हे एक दूरदर्शी नेते : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

    प्रकाशित तारीख: February 5, 2025

    मा. आगा खान हे एक दूरदर्शी नेते : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

    राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी इस्मायली मुस्लीम समाजाचे सर्वोच्च नेते प्रिन्स करीम आगा खान (चौथे) यांच्या नि धनाबददल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

    इस्मायली मुस्लीम समाजाचे सर्वोच्च धार्मिक नेते प्रिन्स करीम आगा खान चतुर्थ यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले.

    मा. आगा खान हे एक दूरदर्शी नेते होते. आपले संपूर्ण जीवन त्यांनी मानवतेची सेवा, आध्यात्मिकता आणि जगाच्या उत्थानासाठी समर्पित केले. आरोग्य सेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले. महाराष्ट्रातील जनतेशी त्यांचे विशेष भावनिक नाते होते.

    दिवंगत प्रिन्स आगा खान यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण इस्मायली मुस्लीम समाजाला आपल्या शोक संवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.