04.09.2024: तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन
मुंबई, दि.४ : भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज नांदेड येथील सचखंड श्री हजूर साहिबाचे दर्शन केले. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे मंत्री श्री गिरीश महाजन हे ही उपस्थित होते. यावेळी हजूर साहिबचे प्रशासक डॉ.विजय सतबीर सिंग बाथ यांनी त्यांचे स्वागत केले.
राष्ट्रपती मुर्मू यांची ही भेट श्री गुरू ग्रंथ साहिबजींच्या पहिल्या प्रकाश पर्व सोहळ्याच्या वेळी घडली. या निमित्ताने या ऐतिहासिक स्थळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. राष्ट्रपतींनी ‘रुमाला’ अर्पण केला. प्रमुख जत्थेदारांच्या हस्ते त्यांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी लंगर दालनाला ही भेट दिली.
डॉ. सिंग यांनी राष्ट्रपतींना या स्थळाचे महत्त्व आणि त्याचे या परिसराच्या सामाजिक व शैक्षणिक विकासातील योगदान याबाबत माहिती दिली. त्यांना शीख धर्माशी संबंधित काही पुस्तके आणि छायाचित्रेही भेट म्हणून देण्यात आली. राष्ट्रपतींच्या हस्ते हजूर साहिबच्या नवीन लोगोचे अनावरण ही या वेळी करण्यात आले.