बंद

    04.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवनातील श्रीगुंडी यात्रोत्सवाला सुरुवात

    प्रकाशित तारीख : August 4, 2026
    04.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवनातील श्रीगुंडी यात्रोत्सवाला सुरुवात   राज्यपाल ज‍िष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या पूजेने लोकभवन मुंबई परिसरातील पारंपरिक श्रीगुंडी देवी यात्रेला  सुरुवात झाली. राज्यपालांनी देवी मंदीरामध्ये जाऊन देवीमातेची पूजा व आरती केली. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी,  प्रभू राम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले.   यात्रेनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर व इतर परिसरातील अनेक कोळी बांधवांनी देवीचे दर्शन घेतले.   राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले.  लोकभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी लोकभवन परिसरातील ही एकदिवसीय यात्रा भरते.  पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

    राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवनातील श्रीगुंडी यात्रोत्सवाला सुरुवात

    राज्यपाल ज‍िष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या पूजेने लोकभवन मुंबई परिसरातील पारंपरिक श्रीगुंडी देवी यात्रेला सुरुवात झाली.

    राज्यपालांनी देवी मंदीरामध्ये जाऊन देवीमातेची पूजा व आरती केली. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी, प्रभू राम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले.

    यात्रेनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर व इतर परिसरातील अनेक कोळी बांधवांनी देवीचे दर्शन घेतले.

    राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले.

    लोकभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी लोकभवन परिसरातील ही एकदिवसीय यात्रा भरते. पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

    राज्यपाल की उपस्थिति में लोकभवन में श्रीगुंडी यात्रा महोत्सव का शुभारंभ

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा की उपस्थिति में पूजा-अर्चना के साथ मुंबई स्थित लोकभवन परिसर में आयोजित पारंपरिक श्रीगुंडी देवी यात्रा का शुभारंभ हुआ।

    राज्यपाल ने श्रीगुंडी देवी मंदिर में पहुंचकर देवी मां की विधिवत पूजा और आरती की। इसके बाद उन्होंने मंदिर परिसर में स्थित महालक्ष्मी, प्रभु श्रीराम और हनुमान जी की प्रतिमाओं के दर्शन भी किए।

    यात्रा के अवसर पर मुंबई, ठाणे, पालघर तथा आसपास के क्षेत्रों से बड़ी संख्या में कोली समाज के श्रद्धालुओं ने श्रीगुंडी देवी के दर्शन किए।

    इस अवसर पर राज्य के बंदरगाह विकास मंत्री नितेश राणे, कौशल विकास मंत्री मंगलप्रभात लोढ़ा तथा मुंबई की महापौर ऋतु तावड़े ने भी श्रीगुंडी देवी के दर्शन किए।

    लोकभवन स्थित श्रीगुंडी देवी को साकळाई देवी और सागरमाता के नाम से भी जाना जाता है। यह एक दिवसीय यात्रा गुरु पूर्णिमा के बाद आने वाले पहले मंगलवार को आयोजित की जाती है। यात्रा के दौरान सुरक्षा व्यवस्था के लिए पुलिस द्वारा व्यापक बंदोबस्त किया गया।