04.07.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ
राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ
राज्यपाल रमेश बैस यांनी केलेल्या पूजेनंतर मंगळवारी (दि. ४) राजभवनातील एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ झाला.
यावेळी राज्यपालांनी देवीची आरती केली तसेच भाविकांशी संवाद साधला.
आरतीनंतर राज्यपालांनी परिसरातील महालक्ष्मी, दुर्गा, महादेव व हनुमान यांच्या मूर्तींना हार घातला व आपल्या वतीने प्रसाद अर्पण केला.
गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनातील एक दिवसाची यात्रा भरते.
राजभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते.
पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.