बंद

    04.05.2026 : सातो हतामी यांनी घेतली राज्यपालांची भेट; विद्यापीठ तसेच सांस्कृतिक स्तरावर सहकार्य वाढवण्यावर चर्चा

    प्रकाशित तारीख : May 4, 2026
    001

    अस्खलित हिंदी बोलणाऱ्या सातो हितोमी जपानच्या मुंबईतील वाणिज्यदूत; मराठी शिकणार असल्याची माहिती

    सातो हतामी यांनी घेतली राज्यपालांची भेट; विद्यापीठ तसेच सांस्कृतिक स्तरावर सहकार्य वाढवण्यावर चर्चा

    अलाहाबाद येथून हिंदी भाषेचे शिक्षण घेतलेल्या व अस्खलित हिंदी बोलणाऱ्या जपानच्या नवनियुक्त वाणिज्यदूत (श्रीमती) सातो हितोमी यांनी सोमवारी (दि. ४ मे) राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    हितोमी यांनी भारतात दोन वर्षे शिक्षण घेऊन नवी दिल्ली येथील जपानच्या भारतीय दूतावासात एकूण साडे नऊ वर्षे कार्य असून हिंदी पाठोपाठ लवकरच मराठी भाषा शिकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    उभय भाषांची लिपी देवनागरी असल्यामुळे मराठी शिकणे सोपे जाईल असे त्यांनी सांगितले.

    ओसाका विद्यापीठातील प्राध्यापक अकिरा ताकाहाशी यांनी तब्बल १५०० पानांचा मराठी – जपानी शब्दकोश तयार केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

    पुढील वर्षी भारत व जपान राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती हितोमी यांनी राज्यपालांना दिली.

    महाराष्ट्र व जपानमध्ये मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे, यांसह विविध पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये सहकार्य सुरु असून हे सहकार्य शिक्षण, क्रीडा, संस्कृती व इतर क्षेत्रात देखील वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    जपानच्या वाकायामा प्रांताचे महाराष्ट्राशी अगोदरच सहकार्य सुरु असल्याचे सांगून येत्या नोव्हेंबर महिन्यात जपान मुंबईत एका शैक्षणिक परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

    कौशल्य क्षेत्रात जपान महाराष्ट्राला सहकार्य करीत असून टोयोटा कंपनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

    जपानला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्याबद्दल हितोमी यांनी आनंद व्यक्त केला.

    नवनियुक्त जपानी वाणिज्यदूतांचे राज्यात स्वागत करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांना त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठ स्तरावर शैक्षणिक सहकार्य वाढविण्याची विनंती केली.

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पूर्वीपासूनच जपानी भाषा विभाग कार्यरत असून अलीकडेच नागपूर येथील विद्यापीठाने देखील जपानी भाषा विभाग सुरु केला असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    जपान – भारत राजनैतिक संबंधांना पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना हे वर्ष साजरे करताना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मदतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

    जपानी भाषेतील साहित्य, लघुकथा, कविता मराठी भाषेत व मराठी साहित्य जपानी भाषेत भाषांतरित करण्याच्या कार्याला चालना देण्यात यावी असे सांगून अनुवादाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अनुवादकांना राज्यातील जपानी कंपन्यांच्या सहकार्याने सुवर्ण पदके देण्याची योजना राबवावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. जपानी वाणिज्य दूतावासात मराठी भाषेचे वर्ग सुरु केल्यास राज्यातील विद्यापीठातर्फे अध्यापनाची सोय करण्यात येईल असे राज्यपालांनी सांगितले.

    जपानचे पॅनासॉनिक, हिताची, दाईकिन यांसारखे अनेक ग्राहकोपयोगी ब्रॅण्ड्स अनेक वर्षांपासून भारतात असल्यामुळे ते लोकांना भारतीय ब्रँड वाटत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    गेली तीन वर्षे मुंबईत कार्यरत असलेले जपानचे वाणिज्यदूत असलेले यागी कोजी यांची अन्यत्र बदली झाल्यानंतर सातो हितोमी यांची मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

    बैठकीला जपानच्या मुंबईतील कौन्सल शिमादा मेगुमी, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे व सहसचिव एस राममूर्ती हे देखील उपस्थित होते.

    *****

    अस्खलित हिंदी बोलने वाली सातो हितोमी जापान की मुंबई में वाणिज्यदूत; मराठी सीखने की इच्छा व्यक्त

    सातो हितोमी ने राज्यपाल से की शिष्टाचार भेंट; विश्वविद्यालय और सांस्कृतिक स्तर पर सहयोग बढ़ाने पर चर्चा

    इलाहाबाद से हिंदी भाषा का अध्ययन करने वाली और धाराप्रवाह हिंदी बोलने वाली जापान की नवनियुक्त वाणिज्यदूत (श्रीमती) सातो हितोमी ने सोमवार (4 मई) को राज्यपाल जिष्णु देव वर्मा से मुंबई स्थित लोक भवन में शिष्टाचार भेंट की।

    हितोमी ने भारत में दो वर्षों तक शिक्षा प्राप्त की है और नई दिल्ली स्थित जापान के दूतावास में कुल साढ़े नौ वर्षों तक कार्य किया है। उन्होंने बताया कि हिंदी के बाद वह जल्द ही मराठी भाषा भी सीखेंगी।

    उन्होंने कहा कि दोनों भाषाओं की लिपि देवनागरी होने के कारण मराठी सीखना उनके लिए आसान होगा। इस अवसर पर उन्होंने जानकारी दी कि ओसाका विश्वविद्यालय के प्रोफेसर अकिरा ताकाहाशी ने लगभग 1500 पृष्ठों का मराठी-जापानी शब्दकोश तैयार किया है।

    अगले वर्ष भारत और जापान के बीच राजनयिक संबंधों की स्थापना के 75 वर्ष पूर्ण होने जा रहे हैं। इस अवसर पर विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा, ऐसी जानकारी हितोमी ने राज्यपाल को दी। उन्होंने बताया कि महाराष्ट्र और जापान के बीच मेट्रो रेल, बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे जैसे बुनियादी ढांचा क्षेत्रों में सहयोग पहले से जारी है और इसे शिक्षा, खेल, संस्कृति तथा अन्य क्षेत्रों में भी बढ़ाया जाएगा।

    उन्होंने बताया कि जापान के वाकायामा प्रांत और महाराष्ट्र के बीच पहले से सहयोग चल रहा है तथा आगामी नवंबर में मुंबई में एक शैक्षणिक सम्मेलन आयोजित किया जाएगा। कौशल विकास के क्षेत्र में भी जापान महाराष्ट्र की सहायता कर रहा है और टोयोटा यहां के औद्योगिक प्रशिक्षण संस्थानों के साथ काम कर रही है।

    भारत से जापान जाने वाले पर्यटकों की संख्या में लगातार वृद्धि पर भी हितोमी ने प्रसन्नता व्यक्त की।

    नवनियुक्त जापानी वाणिज्यदूत का राज्य में स्वागत करते हुए राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने उनके कार्यकाल में विश्वविद्यालय स्तर पर शैक्षणिक सहयोग बढ़ाने का आग्रह किया। उन्होंने बताया कि सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय में पहले से जापानी भाषा विभाग कार्यरत है और हाल ही में नागपुर के विश्वविद्यालय में भी जापानी भाषा विभाग शुरू किया गया है।

    राज्यपाल ने भारत-जापान संबंधों के 75 वर्ष पूरे होने के अवसर पर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र के सहयोग से सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करने की अपेक्षा व्यक्त की।

    उन्होंने सुझाव दिया कि जापानी साहित्य, लघुकथाओं और कविताओं का मराठी में तथा मराठी साहित्य का जापानी में अनुवाद बढ़ावा दिया जाए। उत्कृष्ट अनुवाद कार्य करने वाले अनुवादकों को राज्य की जापानी कंपनियों के सहयोग से स्वर्ण पदक देने की योजना भी शुरू की जा सकती है।

    राज्यपाल ने यह भी कहा कि यदि जापानी वाणिज्य दूतावास में मराठी भाषा की कक्षाएं शुरू की जाएं तो राज्य के विश्वविद्यालयों की ओर से शिक्षण सुविधा उपलब्ध कराई जाएगी।

    उन्होंने उल्लेख किया कि पैनासॉनिक, हिताची और डाइकिन जैसे कई जापानी उपभोक्ता ब्रांड लंबे समय से भारत में होने के कारण लोगों को भारतीय ब्रांड जैसे लगते हैं।

    मुंबई में पिछले तीन वर्षों से कार्यरत जापान के वाणिज्यदूत यागी कोजी का स्थानांतरण होने के बाद सातो हितोमी की नियुक्ति की गई है।

    बैठक में जापान की मुंबई स्थित काउंसल शिमादा मेगुमी, राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे और सह सचिव एस. राममूर्ति भी उपस्थित थे।