03.08.2025: राज्यपालांच्या हस्ते तामिळनाडूचे माजी मंत्री डॉ वैगई चेलवन यांच्या ‘ओरु नुत्रानदिन तवम’ या पुस्तकाचे नवी मुंबई येथे प्रकाशन
                                राज्यपालांच्या हस्ते तामिळनाडूचे माजी मंत्री डॉ वैगई चेलवन यांच्या ‘ओरु नुत्रानदिन तवम’ या पुस्तकाचे नवी मुंबई येथे प्रकाशन
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज तामिळनाडूचे माजी मंत्री डॉ वैगई चेलवन यांच्या दिनमणी वृत्तपत्रात प्रकाशित लेखांचे तसेच मदुराई रेडिओवरील भाषणांचे संकलन असलेल्या ‘ओरु नुत्रानदिन तवम’ या पुस्तकाचे नवी मुंबई येथे प्रकाशन केले. आपल्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या नवी मुंबई तामिळ संघम तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ‘दिनमणी’चे मुख्य संपादक के वैद्यनाथन, दिल्ली तामिळ संघमचे सचिव मुकुंदन, नवी मुंबई तामिळ संघमचे अध्यक्ष ई एहम्बरम, मीनाक्षी वेंकटेश आदी उपस्थित होते.