बंद

    03.06.2026: महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिन साजरा

    प्रकाशित तारीख : June 4, 2026
    03.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. 'वर्मा फाउंडेशन' आणि 'फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' (F-TAM) यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात संस्थेतील काही कलाकारांनी लोकगीते लोकनृत्यासह सादर केली. विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांच्या संस्कृती व परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाचे (NCLT) माजी न्यायिक सदस्य न्यायमूर्ती (निवृत्त) मदन गोसावी, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा, वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष पी. यू. एन. वर्मा, 'मराठी-तेलगू मंच'चे संस्थापक आणि 'फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र'चे अध्यक्ष जगन बाबू गंजी, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, नेल्लोर येथील 'नाट्यशिरोमणी' शेख नादिया, तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विविध संस्थांचे सदस्य उपस्थित होते.

    महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिन साजरा

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. ३ जून) महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्याचा स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

    हा कार्यक्रम ‘लोकभवन’ मुंबई येथे ‘वर्मा फाउंडेशन’ आणि ‘फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ (F-TAM) यांच्या सहकार्याने आयोजित केला होता. यावेळी संस्थेतील काही कलाकारांनी तेलंगणा राज्याची लोकगीते व लोकनृत्ये सादर केली. यावेळी कलाकारांनी तेलंगणा राज्याचे पारंपरिक गीत ‘जय जय हे तेलंगणा’, ‘आंदे श्री’ तसेच ‘वंदे शिवम शंकरम’ ही गीते सादर केली. यावेळी तेलंगणाचे राज्यपाल श्री शिव प्रताप शुक्ला यांचा व्हिडिओ संदेश देखील दाखविण्यात आला.

    कलाकारांनी रंगीबेरंगी ‘बथुकम्मा’, ‘बोनालू’ आणि इतर पारंपरिक नृत्यप्रकारांनी तेलंगणाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सुंदर दर्शन घडविले असे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले. ‘वर्मा फाउंडेशन’ आणि ‘फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ यांच्या कलाकारांनी सादर केलेल्या उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरणाबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.

    नाट्य शिरोमणी शेख नादिया यांचे सादरीकरण विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या कलात्मकतेने आणि भावपूर्ण अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले असे देखील राज्यपालांनी आपल्या भाषणात म्हटले.

    भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून तेलंगणा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता.

    भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा, नृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. संपूर्ण देश फुलांच्या हाराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला गेला आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत नसून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या संकल्पनेमागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

    कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमाला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाचे (NCLT) माजी न्यायिक सदस्य न्यायमूर्ती (निवृत्त) मदन गोसावी, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा, वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष पी. यू. एन. वर्मा, ‘मराठी-तेलगू मंच’चे संस्थापक आणि ‘फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष जगन बाबू गंजी, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, नेल्लोर येथील नाट्य शिरोमणी शेख नादिया तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विविध संस्थांचे सदस्य उपस्थित होते.

    महाराष्ट्र लोक भवन में मनाया गया तेलंगाना राज्य स्थापना दिवस

    महाराष्ट्र के राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा की प्रमुख उपस्थिति में बुधवार (3 जून) को महाराष्ट्र लोक भवन में तेलंगाना राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रम के माध्यम से मनाया गया।

    यह कार्यक्रम लोक भवन, मुंबई में ‘वर्मा फाउंडेशन’ तथा ‘फेडरेशन ऑफ तेलुगू एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र’ (एफ-टैम) के संयुक्त तत्वावधान में आयोजित किया गया। इस अवसर पर कलाकारों ने तेलंगाना की लोकगीतों पर लोकनृत्य प्रस्तुत किए। कार्यक्रम में तेलंगाना का पारंपरिक गीत “जय जय हे तेलंगाना”, “आंदे श्री” तथा “वंदे शिवम शंकरम” प्रस्तुत किया गया।

    कार्यक्रम के दौरान तेलंगाना राज्य गीत का वादन किया गया तथा तेलंगाना के राज्यपाल श्री शिव प्रताप शुक्ल का वीडियो संदेश भी प्रदर्शित किया गया।

    अपने संबोधन में राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा ने कहा कि बथुकम्मा, बोनालू तथा अन्य पारंपरिक नृत्यों की रंगारंग प्रस्तुतियों ने तेलंगाना की समृद्ध सांस्कृतिक विरासत का सुंदर परिचय कराया। उन्होंने वर्मा फाउंडेशन तथा फेडरेशन ऑफ तेलुगू एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र के कलाकारों को उत्कृष्ट सांस्कृतिक प्रस्तुति के लिए बधाई दी।

    राज्यपाल ने नाट्य शिरोमणि शेख नादिया की प्रस्तुति का विशेष उल्लेख करते हुए कहा कि उनकी कलात्मकता और भावपूर्ण अभिव्यक्ति ने उपस्थित दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया।

    यह कार्यक्रम भारत सरकार की ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ पहल के अंतर्गत आयोजित किया गया था।

    राज्यपाल ने कहा कि भारत के प्रत्येक राज्य की अपनी विशिष्ट वेशभूषा, भाषा, नृत्य और खान-पान की संस्कृति है तथा यही विविधता देश की सबसे बड़ी शक्ति है। उन्होंने कहा कि पूरा देश एक सांस्कृतिक सूत्र में पिरोया हुआ है और ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ पहल विभिन्न राज्यों की संस्कृति को समझने और सराहने का अवसर प्रदान करती है।

    राज्यपाल ने कहा कि विकसित भारत केवल आर्थिक रूप से समृद्ध भारत नहीं है, बल्कि ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ की भावना पर आधारित राष्ट्र है। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि सरकार और समाज यदि मिलकर कार्य करें तो विकसित भारत का सपना अवश्य साकार होगा।

    कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्य व्यक्तियों ने राज्यपाल का अभिनंदन किया।

    इस अवसर पर राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण (एनसीएलटी) के पूर्व न्यायिक सदस्य न्यायमूर्ति (सेवानिवृत्त) मदन गोसावी, प्रसिद्ध फिल्म निर्माता राम गोपाल वर्मा, वर्मा फाउंडेशन के अध्यक्ष पी. यू. एन. वर्मा, मराठी-तेलुगू मंच के संस्थापक एवं फेडरेशन ऑफ तेलुगू एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र के अध्यक्ष जगन बाबू गंजी, राज्यपाल के सह सचिव एस. राममूर्ति, राज्यपाल के परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, नेल्लोर की नाट्य शिरोमणि शेख नादिया शेख नादिया तथा तेलंगाना एवं आंध्र प्रदेश की विभिन्न संस्थाओं के सदस्य उपस्थित थे।