03.04.2022: राज्यपालांच्या हस्ते बांबू सेवकांचा सन्मान
राज्यपालांच्या हस्ते बांबू सेवकांचा सन्मान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातील भालिवली येथे ‘सेवा विवेक’ च्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील ६० बांबू सेवकांचा सन्मान करण्यात आला. भालिवली येथील विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटरतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रमेश पतंगे, अध्यक्ष, हिंदुस्थान प्रकाशन संस्था, दिलीप करंबेळकर व प्रदीप गुप्ता, संचालक विवेक रुरल डेव्हलपमेन्ट सेंटर, खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, विवेक पंडीत, अभिनेते मनोज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते