बंद

    03.01.2026 : लोकभवन येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : January 3, 2026
    03.01.2026 : लोकभवन येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

    लोकभवन येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    सर्वप्रथम राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोकभवन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.