03.01.2025 : राज्यपालांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

राज्यपालांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि 3) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.