02.10.2025: राजभवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली

राजभवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राजभवन येथे गुरुवारी (दि. २) उभय दिवंगत नेत्यांना पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांनी गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. त्यानंतर राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी उभय राष्ट्रीय नेत्यांना अभिवादन केले.