बंद

    02.01.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासातून दिला फिटनेसचा मंत्र

    प्रकाशित तारीख : January 2, 2026
    02.01.2026:  राज्यपालांचे पिंपरखेड येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसह योगाभ्यास

    राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासातून दिला फिटनेसचा मंत्र
    पिंपरखेडच्या आश्रमशाळेत केला योगाभ्यास

    नाशिक, दि. २ जानेवारी २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सकाळी पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसमवेत योगाभ्यास केला. त्यांनी विविध योग प्रात्यक्षिके दाखवितांनाच विद्यार्थ्यांना ‘फिटनेसचा डोस, आधा घंटा रोज’ असे सांगत तंदुरुस्तीचा मार्ग सांगितला.

    राज्यपाल श्री. देवव्रत यांच्यासमवेत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे या योगाभ्यासात सहभागी झाले होते.

    राज्यपाल श्री. देवव्रत यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्व सांगत त्याचे लाभ सांगितले. ते म्हणाले, नियमितपणे योग केल्याने शरीर तंदुरुस्त आणि लवचिक राहते आणि सोबतच आपले आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास योग प्रात्यक्षिके केली पाहिजेत.

    श्री. देवव्रत यांनी विद्यार्थ्यांसमवेत प्राणायाम, अनुलोम विलोम, सेतुबंध, सर्वांगासन, वज्रासन, वक्रसन, मत्स्यासन, सूर्य नमस्कार, शशांकासन, योग मुद्रासन आदी आसने करीत विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे दिले. ही सर्व आसने केल्याने मन शांत आणि निरोगी राहण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्यपाल श्री. देवव्रत यांनी आश्रमशाळेची पाहणी करीत विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला.