01.10.2022: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘उत्तराखंड येथील कृषी क्षेत्र विकासासाठी रेडीएशन संशोधन’ या विषयावरील चर्चासत्र संपन्न
राज्यपालांच्या उपस्थितीत ‘उत्तराखंड येथील कृषी क्षेत्र विकासासाठी रेडीएशन संशोधन’ या विषयावरील चर्चासत्र संपन्न
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाभा अणु संशोधन केंद्र, अणुशक्ती नगर, मुंबई येथे ‘ उत्तराखंड येथील कृषी क्षेत्र विकासासाठी रेडीएशन संशोधन’ या विषयावरील चर्चासत्र संपन्न झाले.
चर्चासत्राला उत्तराखंड विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेचे महासंचालक डॉ दुर्गेश पंत, अभिनेते हेमंत पांडे, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बी सी पांडे, वैज्ञानिक डॉ दिनेश कुमार अस्वाल व डॉ तपन कुमार घंटी, डॉ एच जे पंत, डॉ एच भट्ट आदी उपस्थित होते.
चर्चासत्राचे आयोजन दूनागिरी सामाजिक संस्था व उत्तराखंड सामाजिक संस्था यांनी संयुक्तरित्या केले होते.