बंद

    01.08.2024: राज्यपालांची चैत्यभूमीला भेट

    प्रकाशित तारीख: August 1, 2024
    Governor visits the Chaitya Bhoomi memorial and offered his floral tributes to the Architect of the Indian Constitution Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar

    राज्यपालांची चैत्यभूमीला भेट

    राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यपाल पदाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना म्हणण्यात आली.

    यावेळी राज्यपालांनी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे देखील दर्शन घेतले.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समितीचे महासचिव नागसेन कांबळे तसेच भंते डॉ. राहुल बोधी हे यावेळी उपस्थित होते.