01.07.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत कोइम्बतूर येथे जीएसटी दिन संपन्न
राज्यपालांच्या उपस्थितीत कोइम्बतूर येथे जीएसटी दिन संपन्न
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १ जुलै रोजी कोइम्बतूर येथे जीएसटी दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात कोइम्बतूर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयांतर्गत बड्या करदात्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी जीएसटी कोईम्बतूर प्रधान आयुक्त दिनेश पांगारकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.