01.06.2021 : कुलगुरू शशिकला वंजारी यांच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
कुलगुरू शशिकला वंजारी यांच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ शशिकला वंजारी आणि डॉ रिटा सोनावत यांनी लिहिलेल्या ‘अंडरस्टँडिंग अर्ली चाईल्डहुड एजुकेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १) राजभवन येथे संपन्न झाले.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात लहान मुलांच्या संगोपन आणि शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. त्यामुळे लहान मुलांना शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षित शिक्षकांची मागणी वाढली आहे. लहान मुलांचे संगोपन आणि शिक्षण हे व्यापक आणि जटील क्षेत्र आहे. सदर पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक, प्रशासक, पालक व इतर संबंधितांना या क्षेत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे डॉ वंजारी यांनी यावेळी सांगितले.
ऑथर्स प्रेस प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे.