बंद

    01.05.2025:’६६ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

    प्रकाशित तारीख: May 2, 2025
    01.05.2025: राज्यपालांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला

    ६६ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

    महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि. १ मे) छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व उपस्थितांना संबोधित केले.

    यावेळी राज्यपालांनी समारंभीय संचलनाचे निरीक्षण केले तसेच संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.

    मुख्य शासकीय सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मानद वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन व पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी व नागरिक उपस्थित होते. अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर यांनी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला.

    यावेळी राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल; मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज व बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज यांचा समावेश असलेले ध्वज पथक, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा तसेच ब्रास बँड व पाईप बँड वाद्यवृंद पथकाने संचलन केले.

    मान्यवरांच्या भेटी व शुभेच्छा

    कार्यक्रमानंतर राज्यपालांनी उपस्थित विविध देशांचे मुंबईतील राजदूत – वाणिज्यदूत तसेच सैन्य दलांचे व शासनाचे वरिष्ठ अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी यांचे जवळ जाऊन त्यांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.