01.04.2026: महाराष्ट्र लोकभवन येथे ‘साधना सप्ताह’ कार्यशाळा
महाराष्ट्र लोकभवन येथे ‘साधना सप्ताह’ कार्यशाळा
क्षमता विकास आयोग, भारत सरकार व ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ एप्रिल ते ८ एप्रिल या कालावधीत ‘साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या साधना सप्ताहानिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे बुधवारी (दि. १ एप्रिल) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांचे अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनी यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना साधना सप्ताह कसा साजरा करायचा आहे याबाबत मार्गदर्शन केले.
देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करून त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. या ‘टेक लार्निंग वीक’ अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ दिवसांत किमान ४ तासांचे अभ्यासक्रम iGOT कर्मयोगी भारत पोर्टल वर लॉग इन करुन पूर्ण करावयाचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.