बंद

    १९.०१.२०२०: राज्यपालांनी दाखविली मुंबई मॅरेथॉनला झेंडी

    प्रकाशित तारीख: January 19, 2020

    राज्यपालांनी दाखविली मुंबई मॅरेथॉनला झेंडी

    पन्नास हजार पेक्षा अधिक धावकांनी सहभाग नोंदविलेल्या १७ व्या टाटा मुंबई मॅरेथॉनला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकाजवळून झेंडी दाखवून रवाना केले.

    राज्यपालांनी पूर्ण मॅरेथॉन तसेच दिव्यांग स्पर्धकांच्या मॅरेथॉनला झेंडी दाखवून रवाना केले.

    यावेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजिजू, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख क्रीडा मंत्री सुनील केदार, नौसेनेच्या पश्चिम विभागाचे ध्वज अधिकारी अ‍ॅडमिरल अजित कुमार पी, आदी उपस्थित होते.