बंद

    होळी, रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: March 9, 2020

    होळी, रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात आपल्या वैशिष्ट्यांसह साजरा होत असलेल्या रंगांच्या या सणाच्या माध्यमातून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री व बंधुभाव वृद्धिंगत होतो व त्यातून राष्ट्रीय ऐक्य भावना दृढ होते. या आनंददायी सणानिमित्त मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.