बंद

    स्व. नंदकिशोर नौटियाल पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: September 22, 2019

    महान्युज

    मुंबई, दि. 22 : स्व.नंदकिशोर नौटीयाल यांचा केदारनाथ ते मुंबई पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे व्यक्तीमत्व हे संघर्षातून उभे राहिले आहे. पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील ते एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ते दादर येथील स्वामी नारायण मंदीरातील योगी हॉल येथे स्व.नंदकिशोर नौटीयाल यांच्या प्रार्थना सभेत बोलत होते.

    कार्यक्रमाला पद्मश्री तथा प्रसिद्ध गायक अनूप जलोटा, संपादक विश्वनाथ सचदेव, राजीव नौटीयाल आदींची उपस्थिती होती. राज्यपाल म्हणाले, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांना नंदकिशोर नौटीयाल यांच्या कार्यातून प्रेरणा मिळाली. एक माणूस म्हणून त्यांनी समाजात अनेकांना मदत केली. त्यांच्यातील मानवतेचा भाव गंगा आणि यमूना या नद्यांसारखा पवित्र आहे.

    सांस्कृतिक क्षेत्रात या वर्षापासून पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या पुरस्काराने पद्मश्री अनूप जलोटा यांना सन्मानित करण्यात आले. अनेक साहित्यिकांनी यावेळी विचार व्यक्त केले. यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. त्यांनी विविध देवतांचे दर्शन घेतले.