रेल्वे ट्रॅकवर कामगारांच्या मृत्युने मन हेलावले: राज्यपाल
रेल्वे ट्रॅकवर कामगारांच्या मृत्युने मन हेलावले: राज्यपाल
औरंगाबाद जिल्ह्यात रेल्वे रुळांवर झोपलेल्या कामगारांचा शुक्रवारी (दि.८) मालगाडी अंगावरून गेल्यामुळे चिरडून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या काही निष्पाप कामगारांचा मालवाहू ट्रेनखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समजून मन हेलावले. सर्व मृत व्यक्तींच्या आप्तेष्टांना मी आपल्या तीव्र शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामद्धे म्हटले आहे.
**