बंद

    राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची देशातील राज्यपालांशी करोना बाबत चर्चा; राज्यपाल कोश्यारी मुंबई येथून सहभागी

    प्रकाशित तारीख: March 27, 2020

    27.03.2020

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांसह करोना व्हायरस आजारासंबंधी विविध विषयांवर देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांचेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथून चर्चेत सहभाग घेतला.