राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे ओझर विमानतळ येथे आगमन
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे
ओझर विमानतळ येथे आगमन
नाशिक, दि. 9 सप्टेंबर,2024 (जिमाका वृत्तसेवा):
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी विधासभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, यशवंत राव चव्हाण मुक्त विद्याीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे स्वागत केले.