राज्यपालांनी केली सूर्योदयाच्या साक्षीने योगासने
महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी जागतिक योग दिनानिमित्त राजभवन येथे समुद्रकिनारी सूर्योदयाच्या साक्षीने योगासने केली. राजभवन भेटीसाठी आलेल्या योगप्रेमी नागरिकांसोबत राज्यपालांनी योगासने केली आणि उपस्थितांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.